आई मुलीची पहिली मैत्रीण असते, तसं वडिलांना आपल्या मुलाचा चांगला मित्र का होता येत नाही?
पालकांना मुली वयात आल्याची जाणीव होते, पण मुलंही वयात येतात याचं भान नसतं. समाजात वावरताना वयात येणाऱ्या मुलांना कितपत जबाबदारीची जाणीव करून दिली जाते? आई-वडिलांचा मुलांबरोबर मनमोकळा संवाद असतो का?आपल्याकडे ‘सोळावं वरीस धोक्याचं’ याची नेहमी चर्चा होते. मात्र हे वरीस कोणासाठी धोक्याचं, याचं उत्तर मात्र सहसा दिलं जात नाही. मुलं १६ वर्षांची झाली म्हणून पालकांना धोका की मुलांना?.......